MahaFast News 100 : ”नाव आणि चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे. ही शाखा आमचीच”, शिवसेनेच्या नेत्याने ठाकरे गटाला सुनावलं
शिवसेना नाव आणि चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे ही शाखा आमचीच असा दावा शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
ठाणे : होळीच्या पुर्वसंधेला ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याने वातावरण तंग बनले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला मात्र कार्यकर्ते आक्रमक दिसत होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेना नाव आणि चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे ही शाखा आमचीच असा दावा शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी होळीचे दहन करत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी देशातील द्वेशाचे राजकारण नष्ट व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अकोल्यात आमदार अमोल मिटकरी यांनी महागाईच्या प्रतिकात्मक होळीचं दहन केलं. याचदरम्यान कोल्हापूरमधून तिसऱ्या आघाडीची चर्चा मध्यंतरी सुरू होती. त्यावर माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी असली कोणतिही चर्चा नसल्याचे म्हटलं आहे.