Super Fast News | शिंदे-फडणवीस सरकारचं महिलांना गिफ्ट, एसटी प्रवासात सरसकट ५० % सूट

| Updated on: Mar 10, 2023 | 8:45 AM

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा मिळणार आहे. तर राज्य सरकार ही त्या संदर्भात हप्ता भरणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली

Super Fast News | राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मांडला. त्यातून कोणत्या घटकाला काय मिळणार याकडे सगळ्यांचेच लागले होते. त्यानंतर अनेक चांगल्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. याचतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा मिळणार आहे. तर राज्य सरकार ही त्या संदर्भात हप्ता भरणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठी घोषणा केली असून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना सरसकट पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे. राज्य शासनाने मुलींच्यासाठीही मोठा निर्णय घेत लेक लाडकी योजना सुरू केली आहे. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार आणि अठरा वर्षानंतर 75 हजार रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्रातील 86 हजार कृषी पंपांना तातडीच्या जोडण्यात देणार अशी घोषणाही अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा संवर्धनासाठी 300 कोटींचा निधी ही घोषित करण्यात आला आहे.

Published on: Mar 10, 2023 08:45 AM