Super Fast News | महत्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा; सुपरफास्ट 50 न्यूज

Super Fast News | महत्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा; सुपरफास्ट 50 न्यूज

| Updated on: Mar 31, 2023 | 8:27 AM

मध्य महाराष्ट्र, आणि कोकणात शेतकऱ्यांची चिंता वाढणारी बातमी आहे. मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातील काही ठिकाणी तुरळ पावसाची शक्यता असून विदर्भात ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे

सुपरफास्ट 50 न्यूज | काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मध्यंतरी अवकाळीने विश्रांती घेतली होती. पण आता मध्य महाराष्ट्र, आणि कोकणात शेतकऱ्यांची चिंता वाढणारी बातमी आहे. मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातील काही ठिकाणी तुरळ पावसाची शक्यता असून विदर्भात ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मेट्रोच्या कामामुळे पुण्यात आजपासून 21 वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. गार्डरचे काम हाती घेण्यात आल्याने हा बदल करण्यात आला आहे. तर सांगलीतील रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी असून पुढील 6 महिन्यासाठी बंगळूर जोधपुर बंगळूर आणि मैसूर उदयपूर या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, मुंबईला जाणाऱ्यांसाठी प्रवास सुकर होणार आहे. तर ठाणेकरांची तहान भागवण्यातील यावर्षी येणाऱ्या अडचणी दुर झाल्या आहेत. ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात मुबलक पाणी साठा असल्याने पाणी कपात होणार नाही. मात्र एकाच आठवड्यात पाईपलाईन फुटण्याच्या दोन घटना घडल्याने ठाण्याच्या कोपरीमध्ये लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

Published on: Mar 31, 2023 08:27 AM