सुपरफास्ट 50 न्यूज | साई बाबांच्या घोषणांनी दुमदुमली साईनगरी

सुपरफास्ट 50 न्यूज | साई बाबांच्या घोषणांनी दुमदुमली साईनगरी

| Updated on: Mar 30, 2023 | 8:52 AM

राम नवमी निमित्त बुलढाण्यात महिलांची बाईक रॅली पहायला मिळाली. भाजप आमदार श्वेता महाले बाईक रॅलीत सहभागी होत राम मंदिराला परिक्रमा केला. तर राम नामाचा जयघोष केला

सुपरफास्ट 50 न्यूज | शिर्डीत रामनवमीचा उत्सव जोरात सरू झाला आहे. रामनवमीच्या मुख्य दिवशी साईबाबांची साईनगरी सज्ज झाली. रामनवमी निमित्त साई बाबांच्या घोषणांनी दुमदुमली साईनगरी. आज पहाटेच्या काकड आरतीपासूनच रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली असून भाविकांची मोठी पहायला मिळत आहे. बुलढाण्याच्या शेगाव गजानन महाराज मंदिरात सुद्धा रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. रामनवमी निमित्त शेकडो दिंड्या गजानन महाराज मंदिर शेगावमध्ये दाखल. राम नवमी निमित्त बुलढाण्यात महिलांची बाईक रॅली पहायला मिळाली. भाजप आमदार श्वेता महाले बाईक रॅलीत सहभागी होत राम मंदिराला परिक्रमा केला. तर राम नामाचा जयघोष केला. तर अंबरनाथमध्ये काँग्रेसकडून जय श्रीरामचा नारा देण्यात आला आहे. तर श्री राम नवमीनिमित्त काँग्रेसकडून शहरात बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Published on: Mar 30, 2023 08:52 AM