राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी; धनुष्यबाण चिन्ह गोठवा, शिंदे गटाच्या वकिलांची मागणी

राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी; धनुष्यबाण चिन्ह गोठवा, शिंदे गटाच्या वकिलांची मागणी

| Updated on: Sep 07, 2022 | 12:40 PM

शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या विविध याचिका सुप्रीम कोर्टाकडून घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज या सर्व याचिकांवर घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता येत्या 27 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

Published on: Sep 07, 2022 12:40 PM