Nilesh Rane | पवारसाहेब, तुम्ही काही करु नका,तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत: निलेश राणे
अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील”, असं निलेश राणे म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऑक्सिजन तुटवडा (Oxygen shortage) भरुन काढण्यासाठी साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे. साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh rane) यांनी पवारांच्या या आवाहनावर निशाणा साधला आहे. “साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील”, असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या बातमीला कोट करुन, हे ट्विट केलं आहे.
Latest Videos