…अन् निर्मला सीतारमण भडकल्या, कार्यकर्त्याला झाप झाप झापलं; पुण्यात नेमकं काय घडलं?
भाजपाच्या मिशन बारामती अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियनांतर्गत अर्थमंत्री सीतारमण यांनी बारामतीचा दौरा केला. त्यानंतर पुण्यात त्यांनी गुरुवारी एका कार्यकर्त्याच्या घरी बूथ अध्यक्षांची बैठक घेतली.
पुणे : भाजपाच्या (BJP) मिशन बारामती (Baramati) अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियनांतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या बारामती दौऱ्यावर आहेत. पुण्यात त्यांनी गुरुवारी एका कार्यकर्त्याच्या घरी बूथ अध्यक्षांची बैठक घेतली. परंतु ज्या कार्यकर्त्याच्या घरी बैठक झाली, त्याने निर्मला सीतारमण यांच्यासोबत एक फोटो काढण्याची मागणी केली. कार्यकर्त्याची मागणी एकूण अर्थमंत्री निर्माल सीतारण यांचा पारा चढला. त्यांनी या कार्यकर्त्याला चांगलंच झापल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. भाजपाच्या वतीने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारमण या बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पुण्यात त्यांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी बूथ अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीनंतर संबंधित कार्यकर्त्याने सीतारमण यांच्यासोबत फोटो काढण्याची मागणी केली. यावरून निर्मला सीतारण यांनी कार्यकर्त्याला चांगलंच सुणावलं आहे.