दंगल घडविण्यात उद्धव ठाकरे यांचा हात? नितेश राणे म्हणाले…
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 2004 च्या दंगलीमागील मास्टरमाईंड उद्धव ठाकरे असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग: नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 2004 च्या दंगलीमागील मास्टरमाईंड उद्धव ठाकरे असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. राणे म्हणाले की, ‘काल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं की, होणाऱ्या दंगलींचा मास्टरमाईंड शोधा. मी अजित पवार यांना सांगेन की, या दंगली होत आहेत, त्याचा मास्टरमाईंड काही दिवसांपूर्वी तुमच्या सिल्व्हर ओकवर आलेला.तुमच्याबरोबर बसलेला. शरद पवार यांच्या बाजूच्या सोफ्यावर बसलेला. त्याचा पत्ता कलानगरमध्ये आहे. मी वारंवार सांगतोय, दंगली घडवून स्वत: मुख्यमंत्री बनण्याची इच्छा या सुप्त डोक्यातून 2004 ला आलेली. ती इच्छा आणि स्वप्न आजही मेलेलं नाही. उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. कारण 1993 च्या दंगलीनंतर राज्यात 1995 ला भाजपची सत्ता आली, असे बोलणारे उद्धव ठाकरे 2004 ला परत तोच प्रयत्न करत होते. 2004 ला झालेल्या बैठकीत माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याबाबत पुष्टी देऊ शकतात.या दंगलीमध्ये उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहेत का? याची चौकशी व्हावी’. उबाटाचे दोन नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे एकमेकांचं तोंड बघत नव्हते. त्यांचे सूर मिळायला लागले आहे. ते आज पुन्हा एकत्र येत आहेत. हा दंगलीचा प्लान आहे का? मुस्लिम समाजात दंगली घडवून आपला मतदान वाढवायचा हा उद्धव ठाकरे यांचा प्लान परत एकदा होतोय का? हे पवार साहेबांनी ओळखावं.