संजय राऊत विसरले की ते 5 वर्ष एनडीचा भाग होते, नितेश राणे भडकले

“संजय राऊत विसरले की ते 5 वर्ष एनडीचा भाग होते”, नितेश राणे भडकले

| Updated on: May 30, 2023 | 3:15 PM

"मोदी सरकारची 9 वर्षे म्हणजे, नाकी नऊ आणणारी" असे वक्तव्य संजय राऊत केले. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "कदाचित संजय राऊत विसरले असतील 2014 पासून ते 2019 पासून ते एनडीए सरकारचे भाग होते.

सिंधुदुर्ग : “मोदी सरकारची 9 वर्षे म्हणजे, नाकी नऊ आणणारी” असे वक्तव्य संजय राऊत केले. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कदाचित संजय राऊत विसरले असतील 2014 पासून ते 2019 पासून ते एनडीए सरकारचे भाग होते. एनडीएच्या सरकारमध्ये त्यांचेमंत्री देखील होते. संजय राऊत आणि त्यांच्या मालकाचे लाड तेव्हा पुरवले जात होते. आदित्य ठाकरे यांची आमदारकी पण मोदी साहेबांमुळेच मिळाली. 25-30 वर्षे असलेली युती उद्धव ठाकरे यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे तुटली. ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन होण्याची तयारी झाली असल्याचे मी पुन्हा बोलतोय.2024 ची निवडणूक आदित्य ठाकरे घड्याळ चिन्हावर लढणार का अशी स्थिती निर्माण झाली आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

Published on: May 30, 2023 03:03 PM