“…तर आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यात ‘हा’ नेता शकुनी” , नितेश राणे यांचा रोख कोणाकडे?
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निटकवर्तीय राहुल कनाल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याची माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर टीकाही केली आहे.
सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निटकवर्तीय राहुल कनाल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याची माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर टीकाही केली आहे. “आदित्य ठाकरेचे अत्यंत निकटवर्तीय त्यांचे लाडके राहुल कणाल उद्या शिवसेनेत प्रवेश करतायेत. हा त्यांच्यासाठी वैयक्तिक धक्काच आहे. जस उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी आहे. तसं वरूण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी आहे. वरूण सरदेसाईमुळे आदित्य ठाकरेच्या जवळ कोणी उरलेलं नाही. सरदेसाईला आवरलं नाही तर उद्धव ठाकरेंची जशी अवस्था झाली तशी अवस्था आदित्य ठाकरेची होईल,” असं नितेश राणे म्हणालेत.