काश्मिरपेक्षा तुम्ही राज्यातील हिंदू बांधवांना सांभाळा

काश्मिरपेक्षा तुम्ही राज्यातील हिंदू बांधवांना सांभाळा

| Updated on: Jun 05, 2022 | 8:14 PM

काश्मिरमधील हिंदू पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केल्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली.

काश्मिरमधील हिंदू पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केल्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावेळी त्यांनी राज्यातील दंगलींचा विषय काढून पालघर, मालाड, मुंबईतील मालवणी या ठिकाणी होणाऱ्या हिंदू कुटुंबावर होणारे हल्ले आणि त्यांना सोडवी लागणारी त्यांची घरे याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काश्मिरमधील पंडितांविषयी बोलण्यापेक्षा राज्यातील हिंदू बांधवांना सुरक्षित ठेवा असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी काश्मिरचा मुद्दा सोडवण्यासाठी सक्षम आहेत, त्यामुळे त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत त्यांना काही कामं नाहीत, त्यामुळे ते भाजप टीका करतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: Jun 05, 2022 08:14 PM