संजय राऊत मविआचे गौतमी पाटील, भाजपच्या नेत्याची बोचरी टीका

“संजय राऊत मविआचे गौतमी पाटील”, भाजपच्या नेत्याची बोचरी टीका

| Updated on: Aug 03, 2023 | 2:51 PM

संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत.तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं. पण त्यांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे, असा टोला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

सिंधुदुर्ग : संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं. पण त्यांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे. गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपच सामान राऊत यांना पाठवून दे, असा टोला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.आज सकाळी गजानन कीर्तिकरांवर राऊत यांचं फार प्रेम ऊतू जात होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते तास न् तास बसून राहायचे. पण भेट व्हायची नाही. आज मात्र राऊत कीर्तिकरांबाबत भरभरून बोलत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

Published on: May 27, 2023 01:55 PM