Nitesh Rane | 'ही तर शिल्लक सेना', उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा नितेश राणे यांचा पलटवार

Nitesh Rane | ‘ही तर शिल्लक सेना’, उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा नितेश राणे यांचा पलटवार

| Updated on: Sep 10, 2022 | 3:16 PM

Nitesh Rane | भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता पक्ष म्हणून जे काही उरलं आहे, त्याला शिल्लक सेना असं म्हणा, असा टोला त्यांनी लगावला.

Nitesh Rane | भाजप आमदार नितेश राणे (Nitish Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांच्याकडे आता पक्ष म्हणून जे काही उरलं आहे, त्याला शिल्लक सेना असं म्हणा, असा टोला त्यांनी लगावला. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या काळात सर्वाधिक निर्बंध हिंदूच्या सणांवर आणि हिंदूवर घालण्यात आल्याचा आरोप राणे यांनी केला. तसेच शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारता आले नाही. पण याकूब मेमनच्या कबरीवर फुलं उधळण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला. आता शिवसेना आमच्याकडे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता पक्ष म्हणून जे काही उरलं आहे, त्याला शिल्लक सेना असं म्हणा, असा टोला त्यांनी लगावला.