उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट व्हावी, कोणी केली मागणी?

“उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट व्हावी”, कोणी केली मागणी?

| Updated on: Jun 27, 2023 | 6:40 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर पंढरपुरात आहेत. काही वेळा आधी त्यांनी विठ्ठल मंदिरात जात दर्शन घेतलं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर ही भाजपची बी टीम आहे, असं म्हटलं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधुदुर्ग: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर ही भाजपची बी टीम आहे, असं म्हटलं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले आहेत. केसीआर ही भाजपाची दुसरी टीम आहे असं म्हणणाऱ्यांना हे झोंबलं. ठाकरे गट ही राष्ट्रवादीची ढ टीम आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्री यांनी हिंदूंच्या देवाचे दर्शन घेतले म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठतोय,” असं नितेश राणे म्हणाले. तसेच “जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांचा दंगली घडवायचा प्रयत्न आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट व्हावी,” अशी मागणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी केली आहे.

Published on: Jun 27, 2023 04:37 PM