संजय राऊत भांडूपमध्ये औटघटकेसाठी, त्यांना सरकारची चिंता नसावी, नितेश राणे यांची टीका

“संजय राऊत भांडूपमध्ये औटघटकेसाठी, त्यांना सरकारची चिंता नसावी”, नितेश राणे यांची टीका

| Updated on: Jun 29, 2023 | 4:47 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांचा मंजूर जामीन रद्द व्हावा अशी मागणी करत ईडीने कोर्टात धाव घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधुदुर्ग :  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांचा मंजूर जामीन रद्द व्हावा अशी मागणी करत ईडीने कोर्टात धाव घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.संजय राऊत शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हे सरकार जाणार अस बोलतात, मात्र पत्राचाल घोटाळ्याचा निकाल कधी ही लागेल. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकाराच्या औटघटकेची चिंता करू नका, तुम्ही भांडुपमध्ये औटघटकेचे राहिले आहात, असं नितेश राणे म्हणाले.

Published on: Jun 29, 2023 04:47 PM