राहुल गांधी यांना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करायला लावा; उद्धव ठाकरे यांना कोणी दिलं चॅलेज?

“राहुल गांधी यांना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करायला लावा”; उद्धव ठाकरे यांना कोणी दिलं चॅलेज?

| Updated on: Aug 07, 2023 | 11:00 AM

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात काल संयुक्त बैठक पार पडली. ही बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी औरंग्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपवर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात काल संयुक्त बैठक पार पडली. ही बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी औरंग्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपवर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी औरंग्याची वृत्ती. उद्धव ठाकरे नमक हराम माणूस आहे, ते कुणाचे झाले नाही. उद्धव ठाकरे स्वत:च्या वडिलांचे झाले नाही, भावाचे झाले नाही. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे सख्या भावापेक्षाही जास्त लाड केले. आज त्याच देवेंद्रजींना हे नाव ठेवतायत. गेल्या दोन-तीन आठवड्यात ज्या कारवाया रवींद्र वायकर आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर होत आहेत, त्यावरून एक बाप म्हणून उद्धव ठाकरे यांना भीती वाटतेय. त्यांना कळून चुकले आहे की, माझा मुलगा हा दिवाळीपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये जाणार आहे. म्हणून भाजपावर देवेंद्रजींवर राग काढण्याचे काम सुरू आहे. आता बाळासाहेबांचं नाव लावतात आणि जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बाळासाहेबांचे नाव लावायला लाज वाटत होती, उद्धजींना चॅलेंज करतो, इंडियाची बैठक घेताना राहुल गांधींना शिवतिर्थावर आणा आणि तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करायला सांगा. मग तुम्हाला मानतो.”

 

Published on: Aug 07, 2023 11:00 AM