तृतीयपंथींनी केलेल्या आंदोलनावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘मी बाळासाहेब ठाकरे बोलले तेच बोललो’
त्यांनी ठाकरे यांच्याबाबत इन्स्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुकवर पोस्ट टाकत ठाकरे यांचा हिजड्यांचे सरदार असा उल्लेख केला होता. त्यावरून पुण्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. येथे तृतीयपंथींनी आंदोलन केलं.
पुणे : माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी ठाकरे यांच्याबाबत इन्स्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुकवर पोस्ट टाकत ठाकरे यांचा हिजड्यांचे सरदार असा उल्लेख केला होता. त्यावरून पुण्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. येथे तृतीयपंथींनी आंदोलन केलं. तसेच राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी लावून धरली. यावेळी पोलीस आणि तृतीयपंथीय यांच्यात झटापट झाली. यावरून नितेश राणे यांनी, आधी आपलं स्टेटमेंट तृतीयपंथीय समाजाने ऐकून घ्या. ते ऐकत नसतील अस मला वाटतं. कारण आपण उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हिजड्यांचे सरदार असा करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातीलच वाक्य वापरलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीच जे काँग्रेससमोर झुकतील ते हिजडे असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे २०१९ पासून ठाकरे हे काँग्रेससमोर झुकत आहेत. त्यावरून आपण त्यांनी हिजड्यांचे सरदार असं म्हटल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर आधी तृतीयपंथीयांनी वाक्य ऐकावं आणि त्यानंतर त्यांनी कोर्टात जावं असं देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे.