Special Report | डिनो मोरिया मुंबई मनपाचा वाझे- नितेश राणे

| Updated on: Aug 26, 2022 | 12:18 AM

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नितेश राणेंनी मराठीचा मुद्दा ताजा केला. आणि मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असल्याचं निदर्शनास आणलं.

मुंबई : काल विधानसभेत नितेश राणेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आणि तेही डिनो मोरियाचं नाव घेऊन. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नितेश राणेंनी मराठीचा मुद्दा ताजा केला. आणि मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असल्याचं निदर्शनास आणलं. मुंबईतली सगळी कंत्राटं ज्या व्यक्तींना दिली गेली, त्यात एकाही मराठी माणसाचा समावेश नसल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. बाळासाहेबांचं नाव घेण्याचा आम्हाला अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाचा उल्लेख नेहमीच गद्दार असा केलाय. त्यावरही नितेश राणेंनी आक्षेप घेतला. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. आणि नितेश राणेंनी थेट मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन ठाकरे कुटुंबालाच टार्गेट केलंय. आता शिवसेना याला कसं उत्तर देणार हेच पाहावं लागेल.

Published on: Aug 26, 2022 12:18 AM