Nitesh Rane : …तर माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस देणार, नितेश राणेंची मोठी घोषणा, पण घातली एक अट!
भाजप आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांवर मंगळवारी बक्षिसांची खैरात करण्यात आली. त्यात एक जेसीबी, बोलेरो, ट्रक्टर, बुलेट आणि अन्य दुचाकींचा समावेश होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही शर्यत पार पडली. त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करुन मोठी घोषणा केलीय.
बैलगाडा शर्यतीबाबत आमदार नितेश राणे यांनी मोठी घोषणा केलीय. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांवर मंगळवारी बक्षिसांची खैरात करण्यात आली. त्यात एक जेसीबी, बोलेरो, ट्रक्टर, बुलेट आणि अन्य दुचाकींचा समावेश होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही शर्यत पार पडली. त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करुन मोठी घोषणा केलीय. मात्र, ही घोषणा करताना त्यांनी एक अटही ठेवली आहे.
‘ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, त्या वर्षी महेश लांडगे दादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटाला) माझ्याकडून एक मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल’, अशी घोषणाच नितेश राणे यांनी केलीय. नितेश राणेंच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा फडणवीस आणि मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे.
“ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी साहेब होतील त्या वर्षी आमदार महेशदादा दादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल.” @maheshklandge @Dev_Fadnavis pic.twitter.com/Pz2KPbP5bC
— nitesh rane (@NiteshNRane) May 31, 2022