संजय राऊत यांची सुरक्षा काढण्यात यावी, धमकी प्रकरणावरून नितेश राणेंची सरकारकडे मागणी

“संजय राऊत यांची सुरक्षा काढण्यात यावी”, धमकी प्रकरणावरून नितेश राणेंची सरकारकडे मागणी

| Updated on: Jun 15, 2023 | 2:55 PM

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकी प्रकरणात मयूर शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा मयूर शिंदे संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकी प्रकरणात मयूर शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा मयूर शिंदे संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. दोघांचे फोटो समोर आले आहेत. या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. “संजय राऊत हा एक नंबरचा बोगस माणूस आहे, हे सर्व या प्रकरणात सिद्ध झालय” असं संदीप देशपांडे म्हणाले. या संपूर्ण घटनेवर आता नितेश राणे यांनी संजय राऊत यांची सुरक्षा काढण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

Published on: Jun 15, 2023 02:55 PM