देवेंद्र फडणवीस कलंकित? पण तुमच्या फॅक्ट्रीत शेणाची खाण!, नितेश राणे यांचा घणाघात

“देवेंद्र फडणवीस कलंकित? पण तुमच्या फॅक्ट्रीत शेणाची खाण!”, नितेश राणे यांचा घणाघात

| Updated on: Jul 12, 2023 | 2:46 PM

‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. भाजपने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. अशातच भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

सिंधुदुर्ग : ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. भाजपने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. अशातच भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “छत्रपतींच्या विरोधात जाऊन सूर्याजी पिसाळ मोगलांना मदत करत होता. आज संजय राऊतच्या रूपाने जन्माला आला आहे. राऊत याने शिवसेनेच्या विरोधात जी भूमिका निभावली. तीच भूमिका पिसाळने छत्रपतींच्या विरोधात निभावली होती. तसंच राऊत प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या राजकारणात करतायेत.कलंकित राजकारणावर बोलताना तुमच्या फॅक्ट्रीत शेणाची खाण आहे. त्याची माहिती पण द्या. कलंकित असलेला तुझ्या मालकाचा मुलगा कलंकित वाटत नाही का?उद्धव कलंकीत ठाकरे हे नाव आता तयार झालं आहे. झाकीरचं नाव घेताना तुला लाज वाटली पाहिजे.”

Published on: Jul 12, 2023 02:46 PM