“उद्धव ठाकरे यांचा नेमका धर्म कोणता?”, ‘त्या’ बॅनरवरून नितेश राणे यांचा घणाघात
पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागताच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांचा ‘धर्माभिमानी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागताच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांचा ‘धर्माभिमानी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरेंच्या बॅनरवर धर्माभिमानी उल्लेख करण्यात आला आहे. यावरून मला त्यांना विचारायचं आहे की, तुमचा नेमका धर्म कुठला. कारण त्यांनी हिंदू धर्म कधीच सोडलेला आहे. हिंदू धर्माचा ते द्वेष करतात. त्यांचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे. उद्धव ठाकरेंनी सांगावं की त्यांच्या शरीरात भगवं रक्त आहे का?,” अस नितेश राणे म्हणाले.
Published on: Jul 09, 2023 05:25 PM
Latest Videos