दंगली कुणाला हव्या? याचा मास्टरमाइंड कोण? नितेश राणे यांच्या निशाण्यावर कोण?

दंगली कुणाला हव्या? याचा मास्टरमाइंड कोण? नितेश राणे यांच्या निशाण्यावर कोण?

| Updated on: Jun 07, 2023 | 1:17 PM

कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला. जमावबंदी आदेश झुगारून काढलेल्या या मोर्चावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड झटापट झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.दरम्यान, यासंदर्भात नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहे.

सिंधुदुर्ग: कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला. जमावबंदी आदेश झुगारून काढलेल्या या मोर्चावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड झटापट झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.दरम्यान, यासंदर्भात नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहे. “राज्यात औरंगजेबवरच प्रेम अचानक आलेलं नाही, त्यामागे निश्चित सूत्र आहे. काही महिन्यांपासून संजय राऊत महाराष्ट्र राज्यात दंगल होणार आहे, असे बोलत आहे, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत”, असा आरोप नितेश राणे यांनी केला. “या दंगलीमागे उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहे का? उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

Published on: Jun 07, 2023 01:17 PM