संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन दाखवावं, भाजपच्या 'या' बड्या नेत्याचं आव्हान

संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन दाखवावं, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं आव्हान

| Updated on: Aug 02, 2023 | 9:24 AM

भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 'संजय राऊत यांनी त्र्यंबकेशवरला जाऊन दाखवावं. संजय राऊत यांचं शुद्धीकरण करायचं आहे, कारण त्यांचं लव्ह जिहाद झालं आहे', अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये जे गोमूत्रधारी आहेत, तेच दंगलखोर आहेत. त्यांची पहिली चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

पुणे : भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘संजय राऊत यांनी त्र्यंबकेशवरला जाऊन दाखवावं. संजय राऊत यांचं शुद्धीकरण करायचं आहे, कारण त्यांचं लव्ह जिहाद झालं आहे’, अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये जे गोमूत्रधारी आहेत, तेच दंगलखोर आहेत. त्यांची पहिली चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. यावर नितेश राणे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरे यांना आनंद काँग्रेस जिंकल्याचा झाला की पाकिस्तान?’, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. तर ‘नाना पटोले यांनी दंगलीबद्दल बोलू नये, त्यांच्या पक्षात पाकिस्तान जिंदाबाद जास्त चालतं, त्यामुळे दंगलीमध्ये रॉकेल कोण टाकतंय हे त्यांना चांगलं माहित आहे’, असं नितेश राणे म्हणाले.

Published on: May 18, 2023 04:31 PM