इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेवरुन राज्य सरकावर टीका, नितेश राणे यांचा अमित ठाकरे यांच्यावर पलटवार...

इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेवरुन राज्य सरकावर टीका, नितेश राणे यांचा अमित ठाकरे यांच्यावर पलटवार…

| Updated on: Jul 22, 2023 | 7:53 AM

इर्शाळवाडीतील दुर्घटनेवरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी बोचरी टीका त्यांनी केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी आपल्या नेहमीच्या शब्दात अमित ठाकरे यांचा समाचार घेतला.

मुंबई, 22 जुलै 2023 | इर्शाळवाडीतील दुर्घटनेवरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी बोचरी टीका अमित ठाकरे यांनी केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी आपल्या नेहमीच्या शब्दात अमित ठाकरे यांचा समाचार घेतला. नितेश राणे म्हणाले की, “अमित ठाकरे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. ते तरुण आहेत. राजकारणात नवीन आहेत. त्यांचे ट्रेनिंग सुरू आहे. हे त्यांचे ट्रेनिंगचे वर्ष असल्याने त्यांना थोडी संधी दिली पाहिजे. त्यांनी सरकारव टीका केली हे ठीक आहे. आता सरकार म्हणून त्यांना उत्तर देऊ. मात्र ते आता शिकत आहेत. राज्यात फिरत आहेत. याबाबत आमची असलेली भूमिका त्यांना समजावून सांगू.”

Published on: Jul 22, 2023 07:53 AM