मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? नितेश राणे यांनी दिला 'हा' इशारा...

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? नितेश राणे यांनी दिला ‘हा’ इशारा…

| Updated on: Jul 09, 2023 | 7:52 AM

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारावरून भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत खळबळजनक विधान केलं आहे. ते म्हणाले की...

मुंबई : आमागी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. भाजपने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काढून ठाकरे गटावर निशाणा केला आहे. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप करण्यात येत आहे. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केलं आहे. ते म्हणाले की, “संजय राऊत तुमच्या मालकाचा पुत्र आदित्य ठाकरे हे येत्या दिवाळीपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये नाईट लाीफ साजरी करणार आहेत. सगळे पुरावे गोळा करून सगळी बोटं आदित्य ठाकरे यांच्याकडे वळत आहेत.”

Published on: Jul 09, 2023 07:52 AM