खंडणी डीलमध्ये सहभाग? कराड अन् मुंडेंशी काय रिलेशन? सुरेश धसांनी उल्लेख केलेला ‘तो’ नितीन बिक्कड थेट म्हणाला…

| Updated on: Jan 06, 2025 | 1:59 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी नितीन बिक्कड याचं नाव थेट घेतलं होतं. दरम्यान, सुरेश धसांनी केलेला आरोप नितीन बिक्कड याने फेटाळला आहे. ही बातमी खोटी असल्याचे म्हणत नितीन बिक्कड यांने सांगितले

खंडणी प्रकरणात डील झाली, तोडपानी झाली तेव्हा धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी नितीन बिक्कड होता असा आरोप होतोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी नितीन बिक्कड याचं नाव थेट घेतलं होतं. दरम्यान, सुरेश धसांनी केलेला आरोप नितीन बिक्कड याने फेटाळला आहे. ही बातमी खोटी असल्याचे म्हणत नितीन बिक्कड यांने सांगितले ,“14 जूनला मी गावी होतो. 14 जून नंतर दोन-तीन दिवसांनी मुंबईत आलो. त्यानंतर पूर्ण आठवडा मुंबईत होतो. पण वाल्मिक अण्णा कराडशी कुठलाही कॉन्टॅक्ट झाला नाही असं नितीन बिक्कडने सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता, तेव्हा धनंजय मुंडेंना मी भेटायचे असं तो म्हणाला. दरम्यान, धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराडशी काय संबंध आहे? त्यावर नितीन बिक्कडने सांगितलं की, “माझा त्यांच्याशी कसलाही संबंध नाही. माझा कॉल झालेला नाही” “धनंजय मुंडे त्यांच्या निवासस्थानी आहेत का? याची माहिती घेऊन त्यांना भेटायला मी गेलो होतो. माझं काम झाल्यावर मी निघून गेलो” असे बिक्कड यांनी सांगितले. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हटलं?

Published on: Jan 06, 2025 01:59 PM
Shrad Pawar letter to CM : ‘शक्यता नाकारता येत नाही…’, बीड हत्या प्रकरणावरून शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
HMPV Virus : चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, ह्यूमन मेटान्यूमोचा पहिला रूग्ण कुठं? चिमुकलीला लागण