नितीन देशमुख पळून आले नाही, चार्टर विमानाने आम्ही त्यांना पाठवले- एकनाथ शिंदे गटाचा दावा
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या यादीत नितीन देशमुखही सामील होते मात्र अत्यंत नाट्यमय रित्या त्यांच्याबद्दलचे खुलासे समोर येत आहेत. आधी नितीन देशमुख यांच्या छातीत दुखत असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पसरले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. दुसरीकडे आमदार देशमुख यांच्या पत्नीने त्यांच्या पतीच्या सुटकेसाठी पोलीस तक्रार केली. काल अनिल देशमुख हे नागपुरात आले आणि […]
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या यादीत नितीन देशमुखही सामील होते मात्र अत्यंत नाट्यमय रित्या त्यांच्याबद्दलचे खुलासे समोर येत आहेत. आधी नितीन देशमुख यांच्या छातीत दुखत असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पसरले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. दुसरीकडे आमदार देशमुख यांच्या पत्नीने त्यांच्या पतीच्या सुटकेसाठी पोलीस तक्रार केली. काल अनिल देशमुख हे नागपुरात आले आणि त्यांनी एकनाथ शिंदे गटावर एकामागून एक गंभीर आरोप करणे सुरु केले. मला काही लोकांनी बळजबरीने इंजेक्शन दिले असा आरोप देशमुख यांनी केला. तसेच त्यांच्यासोबत घातपाताचा प्रयत्न झाल्याचेही ते म्हणाले पण आता शिंदे समर्थांकडून काही फोटो आणि व्हिडीओ जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये नितीन देशमुख हे पळून आले नसून त्यांना एकनाथ शिंदे यांनी चार्टर्ड विमानाने पाठवले असल्याचे स्पस्ट होत आहे.