बाळासाहेबांची 'ती' इच्छा अपूर्णच! राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट

बाळासाहेबांची ‘ती’ इच्छा अपूर्णच! राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 10, 2023 | 7:36 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर भाजप नेते नितीन गडकरी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर भाजप नेते नितीन गडकरी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा, असं बाळासाहेबांनी आपल्याला सांगितले होते. मी तसे प्रयत्न ही केले पण यश आले नसल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.एका कार्यक्रमात गडकरी यांनी हा दावा केलाय. गडकरी यांचा हा दावा उद्धव ठाकरे यांनी मात्र फेटाळून लावलाय.

Published on: Jul 10, 2023 07:36 AM