मंत्री बनू शकले नाही याचं आमदारांना दु:ख, मुख्यमंत्रीपद कधी जाईल याचंही दु:ख असतं, नितीन गडकरी यांच्या कोपरखळ्या
“आजकाल प्रत्येकाला समस्या आहेत, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार दु:खी आहे कारण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्री दु:खी आहेत कारण त्यांना चांगलं खातं नाही मिळालं, ज्यांना चांगलं खातं मिळालं ते दु:खी आहेत कारण त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. तर मुख्यमंत्री यासाठी दु:खी आहेत, असं नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, “आजकाल प्रत्येकाला समस्या आहेत, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार दु:खी आहे कारण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्री दु:खी आहेत कारण त्यांना चांगलं खातं नाही मिळालं, ज्यांना चांगलं खातं मिळालं ते दु:खी आहेत कारण त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. तर मुख्यमंत्री यासाठी दु:खी आहेत कारण आपण पदावर कधीपर्यंत राहू आणि कधी जाऊ याचा भरवसा नाही” राजस्थान विधानसभेद्वारे आयोजित कार्यक्रमात गडकरींनी सध्याचं राजकारण आणि लोकशाहीच्या मूल्यांवर भाष्य केलं. “राजकारणाचा मुख्य उद्धेश हा सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणं हा आहे. मात्र सध्याचं राजकारण केवळ सत्ता मिळवण्यासाठी सुरु असल्याचं दिसतं. लोकशाहीचं अंतिम ध्येय शेवटच्या व्यक्तीचा विकास आहे”, असं गडकरींनी सांगितलं.