कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

| Updated on: Nov 03, 2021 | 1:08 PM

महाराष्ट्रासह देशाभरात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून शासन प्रशासन प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. मात्र कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही, असं ते म्हणाले आहेत. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वक्तव्याने आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : महाराष्ट्रासह देशाभरात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून शासन प्रशासन प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. मात्र कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही, असं ते म्हणाले आहेत. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वक्तव्याने आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.निवृत्ती महाराज इंदोरीकर आपल्या नवनव्या वक्तव्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या पाठीमागचा वादाचा फेरा काही संपत नाही. पाठीमागे मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते वादाचं मोहोळ शांत होत नाही तोपर्यंत इंदोरीकर महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. नाशिक जिल्ह्यातील एका कीर्तनाच्या सोहळ्यादरम्यान ‘कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही’, असं ते म्हणाले.

Nagpur | अनिल देशमुखांना ईडी कोठडी, नागपुरातील निवासस्थानी दिवाळीचा उत्साह नाही
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 3 November 2021