Video : ‘अंबादास दानवे आमच्या विचारांचे, परंतू त्यांच्याशी,’ काय म्हणाले रावसाहेब दानवे
महाविकास आघाडीचे विचार एक सारखे नसल्याने त्यांची तोंडे तीन दिशेला तीन अशी आहेत. त्यामुळे त्यांची जरी काही माणसं लोकसभेला निवडून आली तरी ती त्यांच्याकडे टीकणार नाहीत असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
मुंबई : लोकसभेसाठी भाजपाने बहुतांश उमेदवार जाहीर केलेले आहेत. मला जालनामधून उमेदवारी मिळालेली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. काही ठिकाणी शिल्लक आहेत. ज्या ठिकाणी साईजेबल माणसं आहेत आणि ती आमच्या विचारांची आहेत, त्यांना आम्ही सोबत घेत आहोत, पूर्वीपासून भाजप अशा लोकांना पक्षात घेत आले आहे असे भाजपाचे नेते, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे पूर्वीचे आमच्या विचारांचे आहेत. आता ते त्यांच्या पक्षाचे काम करीत आहेत. आम्ही आमच्या पक्षाचे काम करीत आहोत. आमची काही त्यांच्याशी बोलणी झाली नसल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. संभाजीनगरात आमचा विजय ‘वनवे’ होणार असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. ही जागा भाजपा किंवा शिवसेना एकनाथ गट यांना जरी मिळाली तरी आमचा विजय पक्का असल्याचे दानवे यांनी सांगितले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसणारच आहेत, खरा धक्का त्यांना 4 जूनला बसणार असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.