‘कांद्याला भाव नाही, मग गावात 'नो एन्ट्री'’; कुठं लागले राजकीय पुढारी यांना गाव प्रवेश बंदीचे पोस्टर्स

‘कांद्याला भाव नाही, मग गावात ‘नो एन्ट्री’’; कुठं लागले राजकीय पुढारी यांना गाव प्रवेश बंदीचे पोस्टर्स

| Updated on: Jun 20, 2023 | 11:23 AM

बागलाण तालुक्यात खासदार, आमदारसह सर्व पक्षीय पुढाऱ्यांना केली गाव बंदी केली होती. तर पुढाऱ्यांनी गावात प्रवेश केल्यास त्यांना कांदे फेकून मारू असा इशारा दिला होता. या गोष्टीला आता महिनाही होत नाही तोच आता आराई गावात थेट राजकीय गावात प्रवेश बंदी घातली आहे.

सटाणा (नाशिक) : कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शेतकरी क्रांती मोर्चाने सटाणा, बागलाण तालुक्यात खासदार, आमदारसह सर्व पक्षीय पुढाऱ्यांना केली गाव बंदी केली होती. तर पुढाऱ्यांनी गावात प्रवेश केल्यास त्यांना कांदे फेकून मारू असा इशारा दिला होता. या गोष्टीला आता महिनाही होत नाही तोच आता आराई गावात थेट राजकीय गावात प्रवेश बंदी घातली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सध्या तेथे लागलेल्या पोस्टरची आणि त्यावर असलेल्या व्यंगचित्राची चांगलीच चर्चा होत आहे. बागलाण तालुक्यातील आराई गावात स्वर्गीय शरद जोशी प्रेरीत शेतकरी संघटनेचे नयन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गावात पोस्टर झळकवून राजकीय पुढारी यांना गावात प्रवेश बंदी घातली आहे. या पोस्टरवर व्यंगचित्राच असून ते गावच्या प्रवेशद्वारावर लावले आहे. ज्यात त्यात स्पष्ट उल्लेख केला आहे की, कांदा व इतर शेती पिकांना बाजार भाव मिळत नसल्याने कोणताही राजकीय पुढारी हा लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांना गावात प्रवेश बंदी घातली आहे.

Published on: Jun 20, 2023 11:23 AM