Ramdas Kadam on J.P.Nadda | 'स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार संपवायची कोणाच्यात हिंमत नाही - रामदास कदम

Ramdas Kadam on J.P.Nadda | ‘स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार संपवायची कोणाच्यात हिंमत नाही – रामदास कदम

| Updated on: Aug 01, 2022 | 6:59 PM

बाळासाहेबांचे विचार कोणी संपवु शकत नाही. जर ते निर्दोष असतील तर त्यांना न्याय मिळेल. संजय राऊतांकडे आपण डँशिग नेते म्हणुन पाहतो. राऊतांना आत्मविश्वास आहे त्यांना न्याय मिळेल म्हणुन ते निर्भिड पणे हात वर करत गेले असे कदम म्हणाले

मुंबई : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं एक भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात (Maharashtra) सुरु असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तर हे भाषण अधिकच चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी देशात केवळ भाजपच राहणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीय. भाजपशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. भाजपची लढाई वंशवाद (Racism) आणि परिवारवादाशी आहे, असा दावा नड्डा यांनी केलाय. यावर शिवसेना नेते रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी प्रतिक्रिया दिलेय. बाळासाहेबांचे (Balasaheb) विचार कोणी संपवु शकत नाही. जर ते निर्दोष असतील तर त्यांना न्याय मिळेल. संजय राऊतांकडे आपण डँशिग नेते म्हणुन पाहतो. राऊतांना आत्मविश्वास आहे त्यांना न्याय मिळेल म्हणुन ते निर्भिड पणे हात वर करत गेले असे कदम म्हणाले.

Published on: Aug 01, 2022 06:59 PM