कुठलाही प्लॅन ठरलेला नाही. प्लॅन ठरविणारा मी कोण?, गिरीश महाजन यांचे नेमकं विधान काय?

कुठलाही प्लॅन ठरलेला नाही. प्लॅन ठरविणारा मी कोण?, गिरीश महाजन यांचे नेमकं विधान काय?

| Updated on: Oct 25, 2023 | 11:46 PM

मराठा आरक्षणसंदर्भात सरकार म्हणून आम्ही निश्चितच सकारात्मक आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यायचे आहे. तात्पुरता स्वरूपाचे आरक्षण आम्हाला द्यायचे नाही. त्यामुळे आम्ही आरक्षण संदर्भातला सर्व गोष्टी या तावून सुलाखून करत आहोत.

जळगाव | 25 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केलय. मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून उपोषण थांबवण्याची विनंती केली. मात्र जरांगे पाटील यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली. यावर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही प्लॅन ठरलेला नाही. प्लॅन ठरविणारा मी कोण? मराठा आरक्षणसंदर्भात सरकार म्हणून आम्ही निश्चितच सकारात्मक आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यायचे आहे. तात्पुरता स्वरूपाचे आरक्षण आम्हाला द्यायचे नाही. त्यामुळे आम्ही आरक्षण संदर्भातला सर्व गोष्टी या तावून सुलाखून करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात स्वतः लक्ष घालत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची कालच भीष्म प्रतिज्ञा घेतली. मराठा समाजाला आरक्षण देईल असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवलाच पाहिजे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

Published on: Oct 25, 2023 11:46 PM