Devendra Fadnavis News : 'राजकीय अजेंडा नव्हे तर वरिष्ठांचा आशिर्वाद घेण्यासाठी दिल्ली दौरा'  पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News : ‘राजकीय अजेंडा नव्हे तर वरिष्ठांचा आशिर्वाद घेण्यासाठी दिल्ली दौरा’  पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jul 09, 2022 | 4:48 PM

Fadnavis Visit Delhi : दिल्ली दौरा हा राजकीय अजेंड्यासाठी नसून वरिष्ठांचा आशिर्वाद घेण्यासाठी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवी दिल्ली : राज्यात सत्तांतर नाट्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकत्रित दिल्ली दौरा (Delhi Visit) केला. या दौ-यावरुन राजकीय चर्चांना ऊत आला होता. या दौ-यामागे राजकीय अर्थ शोधण्यात येत असतानाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘राजकीय अजेंडा (Political Agenda) नव्हे तर वरिष्ठांचा आशिर्वाद घेण्यासाठी दिल्ली दौरा’ असे विधान करत या चर्चांना पूर्ण विराम दिला. दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक, त्यानंतर लागलीच बहुमत चाचणी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ या घडामोडीनंतर दिल्ली दौरा हाती घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राजकीय अजेंडा घेऊन दिल्लीत आलो नसून वरिष्ठांचा आशिर्वाद घेण्यासाठी देशाच्या राजधानीत आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या दौ-यात राष्ट्रपती, गृहमंत्री, रक्षामंत्री तसेच भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुपारनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.