Kishori Pednekar | माँ साहेबांच्या जयंतीला शिंदे गटातील एकही आमदार आला नाही, उपनेत्या किशोरी पेडणेकर यांची टीका
Kishori Pednekar | माँ साहेबांच्या जयंतीला शिंदे गटातील एकही आमदार आला नाही, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली.
Kishori Pednekar | माँ साहेबांच्या जयंतीला शिंदे गटातील (Shinde Group) एकही आमदार आला नाही, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केली. हा केवळ सत्तेसाठी चाललेला खटाटोप आहे. हिंदू, हिंदुत्व ही सगळी नाटकं असल्याचा अप्रत्यक्ष टोला पेडणेकर यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला. यांचे लक्ष्य केवळ मुंबई महापालिकेची सत्ता (Mumbai Municipal Corporation) मिळवणे एवढेच आहे आणि मुंबईतील जनता हे सगळं बघत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेची अवस्था नागपूर महापालिकेसारखी करणार असल्याची टीका ही त्यांनी भाजपवर केली. एखाद्या फोटोवरुन कोणालाही बदनाम न करण्याचे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले. लोकांना मदत करण्यासाठी सर्वच जण राजकारणात येतात. कार्यबाहुल्यातून मोठे होतात. त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर फोटोवरुन आरोप न करण्याचे आवाहन त्यांनी केले.