आठ वर्षांपासून वाट बघतोय नव्हे तर खड्डा बुजवतोय ‘रिक्षावाला’, कोण आहे हा अवलिया?
बेतुरकरपाडा येथे राहणारा हा रिक्षा चालक जिथे रस्त्याचे काम सुरू असेल त्या ठिकाणाहून डांबर मिश्रित खडी मागून घेतो. जिथे खड्डे असतील त्याठिकाणी खडी टाकून खड्डे बुजवतो.
कल्याण : डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्ते खड्डे बुजविण्यासाठी एका रिक्षाचालकाने पुढाकार घेतला आहे. बेतुरकरपाडा येथे राहणारा हा रिक्षा चालक जिथे रस्त्याचे काम सुरू असेल त्या ठिकाणाहून डांबर मिश्रित खडी मागून घेतो. जिथे खड्डे असतील त्याठिकाणी खडी टाकून खड्डे बुजवतो. गेल्या आठ वर्षापासून या अवलिया रिक्षा चालकाचा दिनक्रम अविरतपणे सुरू आहे. राजमनी यादव असे या रिक्षा चालकाचे नाव असून सहजानंद चौक येथील खड्डा बुजवतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रिक्षावाल्याचा या नित्य उपक्रमामुळे आता तरी महापालिका खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी पुढाकार घेणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Published on: May 29, 2023 09:19 PM
Latest Videos