Tipu Pathan Video : टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपू पठाणचा व्हिडिओ व्हायरल
Gangster Tipu Pathan Viral Video : पुण्यातला कुख्यात गुंड टिपू पठाण याचा एक नोटा उधळतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात आपल्या टोळक्या सोबत टिपू नाचत असून पैसे उधळत आहे.
कुख्यात गुंड टिपू पठाणचा नोटा उडवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये टिपू पठाण आपल्या टोळक्याला घेऊन नोटा उडवत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. नोटा उडवताना टिपू नोटा उडवत डान्स देखील करत आहे. टिपू हा पुण्याच्या सय्यदनगरमध्ये राहणारा कुख्यात गुंड आहे. तो टोळक्यासोबत नाचत पैसे उधळताना दिसतोय. टिपूवर हत्येचा प्रयत्न, खंडणी, जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल आहे. टिपूचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Published on: Apr 02, 2025 12:31 AM