लोकसभेसाठी आता ‘मनसे’ महायुतीचा प्रचार करणार तर राज ठाकरेंनी सांगितलं पाठिंब्याचं कारण

| Updated on: Apr 14, 2024 | 12:05 PM

पाठिंब्यानंतर पुढची रणनिती ठरवण्यासाठी राज ठाकरेंनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महायुतीच्या मंचावर आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मनसेचे नेतेही दिसतील.

Follow us on

राज ठाकरे यांनी मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. त्यानंतर पुढची रणनिती ठरवण्यासाठी राज ठाकरेंनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महायुतीच्या मंचावर आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मनसेचे नेतेही दिसतील. २०१४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा, २०१९ मध्ये विरोध आणि २०२४ मध्ये पुन्हा मोदींना पाठिंबा दिल्याने विरोधकांनी राज ठाकरेंना चांगलंच घेरलंय. मात्र आपली भूमिका कायम असून ती बदलली नसून धोरणांवर टीका होती तर चांगली काम होत असतील तर स्वागत केलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागे अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दाही महत्त्वाचा ठरल्याचं दिसतंय. जर मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं, असं ते म्हणाले. आणखी काय सांगितलं राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देण्यामागील कारण.. बघा स्पेशल रिपोर्ट