काँग्रेसबाबत विचारताच मुख्यमंत्री हसले आणि म्हणाले, ‘अरे आता…’
त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीवर मोठा परिणाम झाला आहे. याचदरम्यान अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांचे भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी स्वागतच केलं आहे.
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीची वेगळी चुल मांडून वेगळा संसार सुरू केला आहे. मात्र यावेळी त्यांनी वेगळा निवारा करता भाजप, शिंदे गटाने निर्माण केलेल्या संसारात प्रवेश केला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीवर मोठा परिणाम झाला आहे. याचदरम्यान अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांचे भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी स्वागतच केलं आहे. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी काँग्रेसचे देखील काही नेते आता प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरून त्यांनी मुश्किल वक्तव्य केलं. त्यांनी आता आमच्याकडील जागा फुल झाल्या आहेत, असे उत्तर दिलं. यावरून शिंदे यांच्यासह पत्रकारांच्यात एकच हशा पसरला.
Published on: Jul 04, 2023 10:29 AM
Latest Videos