आता चित्ता आणि पेंग्विनवरून राजकारण, शिवसेनेचं म्हणणं काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आठ चित्ते नामेनियातून भारतात आणले. यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली. आदित्य ठाकरेंनी मुंबईत पेंग्विन आणल्यानंतर भाजपनं टीका केली होती. त्याचाच दाखला देत शिवसेनेनं पलटवार केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आठ चित्ते नामेनियातून भारतात आणले. यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली. आदित्य ठाकरेंनी मुंबईत पेंग्विन आणल्यानंतर भाजपनं टीका केली होती. त्याचाच दाखला देत शिवसेनेनं पलटवार केलाय. भाजपची मंडळी आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होती. आता आम्ही चित्ता सरकार म्हणायचं का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलाय. आदित्य ठाकरेंच्या पुढाकारातून जीजाऊ उद्यानात पेंग्विन आणले गेले होते. त्यावेळी भाजपनं टीका केली होती. त्यावर शिवसेनेनं आता त्यावर बोट ठेवलंय.देशात चित्ते नष्ट झाले आहेत. चित्ते देशात राहावेत, यासाठी नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. त्यावर काँग्रेसनं टीका केली.
Published on: Sep 18, 2022 11:15 PM
Latest Videos