एकाच तिकिटावर दिवसभर प्रवास, शक्य आहे का ? काय सांगते ही योजना
मुंबईत रेल्वे, बस, मोनो, मेट्रो अशा प्रवाशी सेवेतून प्रवास करताना वेगवेगळी तिकीट काढताना तुम्हला वैताग येत असेल. पण, आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई : सुट्ट्या पैशासाठी बस कंडक्टरसोबत होणारी बाचाबाची, रेल्वेच्या तिकीट काउंटरवर होणारी भांडणं, तिकिटासाठी लागणारी लांबलचक रंग, त्यामुळे होणार प्रवासाला विलंब असा एक ना अनेक कारणांनी होणाऱ्या त्रासापासून आता तुमची सुटका होणार आहे.
एकाच तिकिटावर मुंबईत दिवसभर प्रवास ही कल्पनाच किती सुखावणारी आहे. पण, हा प्रवास करणं आता शक्य होणार आहे. एमएमआरडीएची एकात्मिक प्रणाली सेवा 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रणालीचे उदघाटन होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आधी मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 साठी एकच तिकीट असणारे कार्ड जारी करण्यात येणार आहे. त्यांनतर यात बेस्ट, रेल्वे, मोनो यांचा समावेश करण्यात येणार आहे.
Latest Videos