शिवसेनेकडून महाराष्ट्रात अजान स्पर्धा, ही शिवसेना बाळासाहेबांची उरली नाही; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

| Updated on: Apr 15, 2021 | 8:21 PM

शिवसेनेकडून महाराष्ट्रात अजान स्पर्धा, ही शिवसेना बाळासाहेबांची उरली नाही; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

बेळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात आज प्रचारसभेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी बुधवारी (14 एप्रिल) बेळगावात प्रचारसभा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज बेळगावात भव्य सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. “संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी या ठिकाणी आले. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नाही”, असा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केली. पाहा संपूर्ण भाषण

 

Published on: Apr 15, 2021 08:21 PM