Video |  'आता मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी...,' काय म्हणाले उद्धव ठाकरे

Video | ‘आता मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी…,’ काय म्हणाले उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 27, 2024 | 5:27 PM

जरांगे यांच्याकडून काही चुका झाल्या असतील त्यांना आश्वस्थ करणे त्यांच्या मागण्या समजून घेणे ही सरकारची जबाबदारी होती. त्यांना आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, तर उद्या न्याय हक्कांसाठी सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरायचेच नाही का ? असाही सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच 50 खोक्यांची सुद्धा एसआयटी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आम्ही ठाम उभे आहोत. मात्र मनोज जरांगे यांच्याकडून काही चूका होत असतील तर तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न का करीत नाही. उत्तरेत शेतकऱ्यांनी आंदोलन केले तेव्हा त्यांना अतिरेकी ठरविण्यापर्यंत सरकारची मजल गेली. मग आता तुम्ही जरांगे यांना अतिरेकी ठरविणार का ? म्हणजे कोणी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरायचेच नाही का असा सवाल माजी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदारांचा अर्थसंकल्प वाटत आहे. मोठे प्रकल्प योजना, रस्ते वगैरे ठीक असले तरी कंत्राटदारांसाठीच त्या आहेत अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात जलपूजन झाले होते. त्याच्या गॅरंटीचे काय झाले असाही सवाल ठाकरे यांनी केले. जरांगे यांच्या सोबत गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला होता त्याचीही एसआयटी चौकशी ‘चिवट’पणे करा अशी मागणी ठाकरे यांनी केली

Published on: Feb 27, 2024 05:25 PM