Video | ‘ओबीसी समाजही मतदान करतो, सरकारने हे…’ भुजबळांनी दिला सरकारला इशारा
मराठा समाजाला ओबीसीतून नको स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी करणाऱ्या छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षण देणार असे म्हटले जात आहे. परंतू हे 54 लाख आल्यानंतर ओबीसींना धक्का नाही तर बुकलून बाहेर काढलं आहे. मुख्यमंत्री बोलतायत आम्ही ऐकतोय पण मनाचे समाधान होत नाही असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळांनी सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाविरुध्द त्यांच्या बंगल्यावर सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे.
मुंबई | 28 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश काढून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईच्या वेशीवरच थोपविण्यात यश मिळवले आहे. परंतू या निर्णयाने ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांनी त्यांच्या ‘सिद्धगड’ या निवासस्थानी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ओबीसी समाजात मोठी चिंता आणि घबराट निर्माण झाली आहे. आमचं आरक्षण आता संपल्याची समाजाची भावना असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. शिक्षण, नोकरी इतर आरक्षणात हे सगळे वाटेकरी होणार असल्याने आरक्षण संपल्याची भावना व्यक्त होत आहे. मराठा मागासवर्गीय आहेत हे सिद्ध करण्यासाठी सर्व यंत्रणा कामी लावली आहे. मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतोय पण मनाचं समाधान होत नाहीए..सर्व एकतर्फी हट्ट पुरविण्याचे काम सुरु आहे. कोणावर अन्याय होणार नाही म्हणतायत…कोणावर अन्याय नाही मग हे 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात. त्याच्या दुप्पट तिप्पट ओबीसीत येणार म्हणजे, ओबीसींना धक्का नाही..तर ओबीसींना ढकलून बुकलून बाहेर काढलं जातंय अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.