फसव्या राजकारणापासून आपण सावध रहा
ज्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही विचारण्यात येतं आहे की, आरक्षण या निवडणुकीत नाही, ते पुढच्या निवडणुकीत तरी राहणार आहे का ? याचा खुलासा त्यांनी करावा असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
सध्याचं राज्यातील राजकारण हे ओबीसींना फसवण्याचं राजकारण सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने मागेच जाहीर केलं होतं की वॉर्ड रचना झालेली आहे, प्रभाग रचना झालेली आहे, त्याचप्रमाणे आपण निर्णय घ्या असं सांगण्यात आले होते असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ओबीसींना 27 टक्के आरक्षण मंजूर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी प्रचार केला की ज्या निवडणुका होणार आहेत. त्या 27 टक्के ओबीसी आरक्षणासोबत घेण्यात येतील असंही सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की, पावसाळा होता म्हणून त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची परवानगी दिली. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण विरहित घेतल्या जातील. त्यामुळे ज्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही विचारण्यात येतं आहे की, आरक्षण या निवडणुकीत नाही, ते पुढच्या निवडणुकीत तरी राहणार आहे का ? याचा खुलासा त्यांनी करावा असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.