Sharad Pawar: ओबीसी आरक्षाणाशिवाय निवडणूका घेणार नाही - शरद पवार

Sharad Pawar: ओबीसी आरक्षाणाशिवाय निवडणूका घेणार नाही – शरद पवार

| Updated on: May 25, 2022 | 4:55 PM

आज ज्यांच्या हातात देश त्यांची मानसिकता वेगळी अशी टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ओबीसी आरक्षणासाठी मागे-पुढे न पाहता सर्वकाही करू. ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावूनच निवडणुका घेऊ.

ओबीसी (OBC) आरक्षाणाशिवाय निवडणूका घेणार नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. एकदा ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा. कळून द्या देशाला नक्की काय सत्य आहे, सत्य बाहेर येऊ द्या असे त्यांनी म्हटले आहे. हा जर न्यायाचा अधिकार आहे तर तो सर्वांना मिळाला पाहिजे. आज ज्यांच्या हातात देश त्यांची मानसिकता वेगळी अशी टीका शरद (Sharad Pawar) पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ओबीसी आरक्षणासाठी मागे-पुढे न पाहता सर्वकाही करू. ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावूनच निवडणुका(Elecation) घेऊ असेही पवार यांनी म्हटले आहे. सत्तेमध्ये जो वाटा न्यायाने द्यायचा आहे तो वाटा ओबीसीना देऊन , त्यांना सत्तेत घेऊन चालू ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.