राऊत यांच्या 'त्या' मागणीवर भाजप नेत्याचा खरमरीत सवाल? टीका करताना म्हणाला, ''त्याला गजणी''

राऊत यांच्या ‘त्या’ मागणीवर भाजप नेत्याचा खरमरीत सवाल? टीका करताना म्हणाला, ”त्याला गजणी”

| Updated on: Jun 03, 2023 | 1:15 PM

या अपघातात आतापर्यंत 238 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर, 650 हून अधिक प्रवासी जखमी असल्याचंही सांगण्यात येतंय. या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत.

मुंबई : ओडिशातील तीन ट्रेनची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 238 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर, 650 हून अधिक प्रवासी जखमी असल्याचंही सांगण्यात येतंय. या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यायला हवा, असं वक्तव्य ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे. त्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. नितेश राणे यांनी राऊत यांना गजणीचा रोग झाल्याचे म्हटलं आहे. तर राऊत यांनी गजणीतील अमिर खान प्रमाणे त्यांच्या अंगावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातील कोरोनामुळे जास्त मृत्यू झाले. मग त्यावेळी का हा सल्ला दिला नाही असं म्हटलं आहे.

Published on: Jun 03, 2023 01:15 PM