गोंडस शब्द वापरून संप पाडण्याचे काम केलं; ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर हल्ला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचारी संघटनेनं संप मागे घेतला आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे
नाशिक : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. तो संप आता मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचारी संघटनेनं संप मागे घेतला आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटलं आहे.
तसेच 14 मार्च पासून सुरू असलेलं हा संप यशाच्या जवळ जात असतानाच सरकारने काही संघटनांना हाताशी घेतले. तर सोशल सिक्युरिटी, सामाजिक सुरक्षा या गोंडे शब्दाच्या नावाखाली हा संप हाणून पाडण्याचे काम केलं. तर समिती नेमून तीन महिन्यात अहवाल देतो असे खोटे आश्वासन दिलं आहे. याने कर्मचाऱ्यांना आज काही मिळालेलं नाही. म्हणून संप मागे न घेण्याचा निर्णय हा आम्ही घेतला आहे. तर संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही असेही त्या म्हणाल्या.